लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वाशिम जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धेचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धेत एकंदरित १२० खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून खेळाडूंच्या हजेरीने जिल्हा क्रीडांगण गजबजल्याचे पाहावयास मिळत आहे. उद्घाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, स्पर्धेसाठी शासनाने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीचे सदस्य मिलिंद देशपांडे, रवींद्र नगरकर, राजदीप मनवर, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकुल येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या २ सिंथेटिक कोर्टवर प्रथमच या राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत. स्पर्धेकरिता राज्यातील विविध आठ महसुली विभागातून नामांकित तथा राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धा प्रकाशझोतात होणार असून १२० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वाशिममध्ये राज्यस्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धेस प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 9:07 PM
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वाशिम जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धेचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धेत एकंदरित १२० खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून खेळाडूंच्या हजेरीने जिल्हा क्रीडांगण गजबजल्याचे पाहावयास मिळत आहे.
ठळक मुद्दे१२० खेळाडूंचा सहभागजिल्हा क्रीडांगण गजबजले