वाशिम : अमरावती येथील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय ‘शिक्षण वारी’ या उपक्रमांतर्गत निवड झालेले ५० शिक्षक सोमवारी सकाळी एस.टी. बसने अमरावतीला रवाना झाले. यासाठी होणाºया खर्चापोटी शासनाकडून ४० हजार रुपयांचा निधी मंजूर असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली. अमरावती येथे १५ डिसेंबरपासून राज्यस्तरीय शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले असून त्याचा समारोप १८ डिसेंबरला होणार आहे. याअंतर्गत राज्यभरातील ५६ प्रयोगशिल शिक्षकांनी अत्यंत कमी खर्चात अभ्यासपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन भरविले आहे. त्यात बोलक्या बाहुल्या, ९० दिवसांत भाषा अवगत करणे, गणितीय क्रिया, विज्ञान कोडे आदिंचा समावेश असून या वारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण देण्याचे ज्ञान राज्यभर पोहोचविण्यात येत आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील ५० शिक्षक सोमवारी एस.टी. बसने हे प्रदर्शन पाहण्यासाठी रवाना झाले. प्रवास आणि भोजनाकरिता होणाºया खर्चापोटी शासनाने ४० हजार रुपयांची निधी दिल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी सांगितले.
राज्यस्तरीय शिक्षण वारी उपक्रम: वाशिम जिल्ह्यातील ५० शिक्षक अमरावतीला रवाना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 2:42 PM
वाशिम : अमरावती येथील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय ‘शिक्षण वारी’ या उपक्रमांतर्गत निवड झालेले ५० शिक्षक सोमवारी सकाळी एस.टी. बसने अमरावतीला रवाना झाले.
ठळक मुद्देअमरावती येथे १५ डिसेंबरपासून राज्यस्तरीय शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले असून त्याचा समारोप १८ डिसेंबरला होणार आहे. वाशिम जिल्ह्यातील ५० शिक्षक सोमवारी एस.टी. बसने हे प्रदर्शन पाहण्यासाठी रवाना झाले.