काही दिवसांपासून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यातच पावसाने पंधरा दिवस दडी मारली परिणामी तापमानात वाढ झाली होती. यामुळे अनेक आजारांनी डोके वर काढले असून पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे . नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन शहरांमध्ये फॉगिंग मशीनद्वारे डास प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी केली आहे. तसेच निवेदनाच्या प्रति आमदार अमित झनक व तहसीलदार रवी काळे यांना देण्यात आल्या आहे.
निवेदन देतेवेळी सनी घुगे, सागर जगताप, सागर अहिर, अमोल पखाले, नितीन रोकडे, सुनील देवकते, आकाश खडसे, वैभव ताजने, नागोराव कांबळे, अजय अवचार, योगेश सरकटे, विजय वानखेडे, आकाश जगताप, अजय गायकवाड, राहुल अवचार, अजय उबाळे , आकाश पट्टेबहादूर, संतोष घुगे , आकाश सोनिग्रा, अतुल लांडगे, योगेश गायकवाड, अक्षय कांबळे आदी उपस्थित हाेते.
270821\5157177-img-20210827-wa0034.jpg
निवेदन