काही दिवसापासून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यातच पावसाने पंधरा दिवस दडी मारली परिणामी तापमानात वाढ झाली होती. यामुळे अनेक आजारांनी डोकेवर काढले असून पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे .सोबतच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रतिबंधात्मक फवारणीची गरज निर्माण झाली आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन शहरांमध्ये फॉगिंग मशीनद्वारे डास प्रतीबंधक फवारणी करावी अशी मागणी केली आहे. तसेच निवेदनाच्या प्रती आमदार अमीत झनक व तहसीलदार रवी काळे यांना देण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी सनी घुगे, सागर जगताप, सागर अहिर, अमोल पखाले, नितीन रोकडे, सुनील देवकते, आकाश खडसे, वैभव ताजने, नागोराव कांबळे ,अजय अवचार, योगश सरकटे, विजय वानखेडे, आकाश जगताप, अजय गायकवाड, राहूल अवचार, अजय उबाळे , आकाश पट्टेबहादुर, संतोष घुगे, आकाश सोनिग्रा, अतुल लांडगे, योगेश गायकवाड, अक्षय कांबळे, भगवान इंगळे, रितश कात्रे, मुकेश खिल्लारे, महेश वैद्ध उपस्थीत होते.
270821\177-img-20210827-wa0034.jpg
निवेदन