धनगर बांधवांनी आमदार झनक यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, धनगर समाज गेली ७० वर्षे त्यांच्या प्रमुख मागण्या शासन दरबारी मांडत आहे; परंतु सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आम्ही सर्व आपल्या मतदारसंघातील धनगर समाजबांधव आपणाकडे विनंती करतो की, सरकारने जरी धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असेल तरी आपण आमचे लोकप्रतिनिधी म्हणून धनगर समाजाच्या मागण्या आपण स्वत: अधिवेशनात उपस्थित कराव्यात. त्यामध्ये धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा, जे आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला त्या सर्व योजना व मागील वर्षाची १ हजार कोटी व चालू आर्थिक वर्षाचे १ हजार कोटी, असे एकूण २ हजार कोटींची तरतूद धनगर समाजासाठी त्वरित करावी, आमदार निधीतून किंवा आपल्या सहकार्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा राजे यशवंतराव होळकर यांचे भव्य स्मारक आपल्या तालुक्यात उभे करण्यात यावे, यावर वाशिम जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते किसनराव मस्के, बबनराव मिटकरी, गणेश गावडे, सुनीता मिटकरी आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विविध मागण्यांसाठी धनगर बांधवांचे आमदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:28 AM