नुकसानग्रस्त शेतकरी पंडित तुकाराम भेंडेकर, निंबाजी तुकाराम भेंडेकर व वामन किसन भेंडेकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, आमच्या मालकीच्या व ताब्यातील शेतजमिनी या मौजे शिवणी (द) व भडकुंभा, ता. मंगरूळपीर येथील रहिवासी असून १४ जुलै रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास गाव शिवारात जोरदार पाऊस सुरू होऊन अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे आमच्या शेतातील पेरलेल्या पिकासह शेतजमीन खरडून गेली असून विहिरीमध्ये गाळ साचला. त्यामुळे गाव परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीबाबत त्वरित चौकशीचे आदेश देऊन पंचनामे करण्यात यावे व नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे शिवणी शिवारातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
----
२०१३ मधील भरपाई अद्यापही नाही
सन २०१३ सालीसुद्धा विहिरी गाळल्या होत्या व पैसेही मंजूर झालेले असताना अद्यापही ती भरपाई मिळालेली नाही. तरी नुकसानीची चौकशी व पंचनामे करण्याचे आदेश देऊन सर्व्हे करण्यात यावे व १५ दिवसांत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.