तालुक्यातील गिर्डा तांडा येथील गावठाणच्या जमिनीवर गावातील लोकांनी अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. गावासमोरील ओढ्याच्या काठावरील गावठाणच्या जमिनीवर मागील काही वर्षांपासून व नव्यानेही शेतीसाठी वृक्षतोड करून लोकांनी अतिक्रमण केले आहे. या जमिनीवर एक सार्वजनिक विहीर आहे. ती विहीरदेखील ताब्यात घेऊन त्याचा वापर शेतीसाठी करण्यात येत आहे. गावातील स्त्रिया तेथे कपडे धुण्यासाठी जात होत्या. आता मात्र अतिक्रमणकर्त्याने त्यांना तेथे कपडे धुण्यासाठीही मनाई केली आहे. अशा स्थितीत ते अतिक्रमण तत्काळ हटविण्यासाठी गावातील स्त्रियांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. तसेच हे अतिक्रमण त्वरित हटवले नाही तर १५ ऑगस्ट २०२१ रोजी उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. यावेळी गिर्डा ग्रामपंचायत सदस्य बलदेव राठोड, समाजसेवक जानकीराम राठोड यांची उपस्थिती होती.
गिर्डा तांडा गावठाणावरील अतिक्रमण हटविण्यासाठी महिलांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:27 AM