फुलउमरी (वाशिम) : गोर बंजारा समाजाची काशी म्हणून ख्यात श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता.मानोरा) येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते १२ फेब्रुवारीला नंगारा वास्तू संग्रालय इमारत परिसरात जगद्गुरू संत सेवालाल महाराज अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण देशभरातून आलेल्या समाजबांधवांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात पार पडले.
पोहरादेवी येथे वाशीम व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे पुढाकारातून जगद्गुरू संत सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा, सेवाध्वज स्थापना व ५९३ कोटी रुपये विकास कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री, खासदार, आमदार व देशातील विविध राज्यातील प्रतिनिधी यांचे साक्षीने १२ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचे हस्ते देशातील लाखो नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संजय राठोड, मंत्री दादाजी भूसे, महंत बाबुसिंग महाराज, आ. निलय नाईक, आ राजेंद्र पाटणी ,माजी मंत्री अमरसिंग तिलावत, खा उमेश जाधव, कबीरदास महाराज, शेखर महाराज, जितेंद्र महाराज, रायसिंग महाराज, यशवंत महाराज, बाळासाहेबांची सेना जिल्ह्याध्यक्ष पराग पिंगळे,उद्योजक योगेश चव्हाण, संजय महाराज, संजय भानावत, रुपेश जाधव, सुंदरसिंग महाराज, बद्या नायक, लोक्या नायक, जगनाथ नायक,अमोल राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी देशभरातून लाखो नागरिक उपस्थित होते.