शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 3:31 PM

वाशिम : सेवाज्येष्ठते नुसार खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना देण्यात येणाºया पदोन्नती प्रक्रियेला शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सेवाज्येष्ठते नुसार खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना देण्यात येणाºया पदोन्नती प्रक्रियेला शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. तथापि, मुख्याध्यापकाचे पद रिक्त असलेल्या शाळेत कामकाज पार पाडण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ज्येष्ठ शिक्षकाकडे पदभार सोपविण्याचे निर्देश ४ डिसेंबरच्या पत्रान्वये दिले आहेत.राज्यातील खासगी शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता व पदोन्नतीबाबत १३ आॅक्टोबर २०१६, २४ जानेवारी २०१७ आणि १४ नोव्हेंबर २०१७ च्या शासन परिपत्रकानुसार सुचना पारित करण्यात आल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मधील एक सिव्हील अपील, तसेच २०१७ मधील एका विशेष अनुज्ञा याचिकेवर दिलेल्या निर्णयास अनुसरून शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबतचे निकष महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १०८१ मधील तरतुदीस अनुसरून तपासण्याची तयारी शासनाने केली आहे. त्यामुळे माध्यमिक शाळेतील शिक्षक संवर्गातील नियमावलीच्या अनुसूची ‘फ’ नुसार ‘क’ प्रवर्गात मोडणाºया शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही स्थगित करण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना ४ डिसेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे दिले आहेत. या दरम्यानच्या कालावधीत माध्यमिक शाळेतील आर्थिक व दैनंदिन कार्यालयीन कामकाज पार पाडण्यासाठी मुख्याध्यापकांच्या रिक्त जागेचा प्रभार संबंधित शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाकडे नियमानुसार सोपविण्याचे निर्देशही या पत्रातून देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव यांनी हे पत्र सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पाठविले आहे.

शासनाचे पत्र पाहून खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या पदोन्नतीबाबतच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात येईल.तानाजी नरळेशिक्षणाधिकारी (माध्यमिक)जि.प. वाशिम

 खाजगी शाळांतील शिक्षकांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्याबाबत शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे; परंतु या पत्रातील निर्देशांची अंमलबजावणी ही माध्यमिक स्तरावरूनच होणार आहे.-अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक