अमोल कल्याणकर
मालेगावः कोरोनाकाळात अनेक शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाकरिता सद्यस्थितीत इंग्रजी शाळांकडून अवाजवी शुल्क आकारण्यात आले आहे. हे शुल्क भरताना पालकाच्या नाकीनऊ आले असून, ऑनलाईन शिक्षणावर होणारा खर्च आणि मोबाईल परवडणारा नाही. अनेक पालकांचे शाळा व्यवस्थापनासोबत अनेकदा वाद होताना दिसून येत आहे. या सर्व प्रकारातून दुखावल्या गेलेल्या अनेक पालकांनी इंगजी शाळेला खो देत, मराठी आणि खाजगी माध्यमाच्या अनुदानित शाळेत सेमी माध्यमाच्या शाळांकडे पावले वळविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जि.प. मराठी माध्यम आणि खाजगी शाळांच्यासाठी ही पोषक परिस्थिती असून शालेय शिक्षण विभागाकडून संयुक्तरीत्या प्रयत्न होण्याची गरज आहे.
तालुक्यातील काही माध्यमिक शाळा वगळता बहुतांश काही मराठी माध्यमाच्या शाळेची परिस्थिती बिकट आहे, दरवर्षीच्या आकडेवारीत विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत असून विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी अनेक शिक्षकांना गावोगावी भटकंती करावी लागते. अनेक ठिकाणी वर्ग तुकड्या कमी झाल्या असून दोन शिक्षक वीस विद्यार्थी किंवा एक शिक्षक दहा विद्यार्थी अशी परिस्थिती दिसून येत आहे, कोरोना प्रादुर्भावाचा वाढता संसर्ग पाहता , महाराष्ट्र राज्य शासनाने इंग्रजी व मराठी शाळा तात्पुरत्या बंद केल्यानंतर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी देखील आम्ही पूर्ण शुल्क का भरायचे, असा प्रश्न इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या पालकांना पडला असून , कोरोना महामारीत अनेकांचा रोजगार गेल्याने हताश होऊन अनेक पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून दाखला काढून आपली मुले जि.प.शाळेत टाकण्यास सुरुवात केली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळाप्रमाणे आम्हीही पालकांना दर्जेदार शिक्षण देऊ, असा विश्वास मराठी माध्यमातील शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना देत आहे . एकीकडे वाढत्या महागाईमुळे हताश झालेला पालक तर दुसरीकडे, इंग्रजी शाळेकडून होणारी लूट, या सर्व प्रसंगात मराठी माध्यमाकडे विद्यार्थी वर्गाची पावले वळत आहे . यात जि.प.शाळा व शालेय शिक्षण समिती , शैक्षणिक क्षेत्रात काय बदल करणार, याकडेच पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे .हा बदल भविष्यात मराठी शाळांचे भविष्य निश्चितच बदलणार यात तिळमात्र शंका नाही.
००००००००००००००००
खाजगी व जिंप च्या शाळा ची पटसंख्या वाढली...
तालुक्यातील इंग्रजी शाळाची फी भरून पालकवर्ग त्रस्त झाले आहे त्यामुळे अनेक पालकांनी आपले पाल्य खाजगी माध्यमाच्या अनुदानित शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे या वर्षी खासगी व्यवस्थापनाच्या सेमी इंग्रजी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा मराठी शाळांची पटसंख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.
इनबॉक्स
घरोघरी पुरवला सेतू अभ्यासक्रम
वरुणाचा कठीण काळ असतानासुद्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी ज्या मुलांकडे मोबाईल नाही त्यांच्या घरोघरी जाऊन स्वखर्चाने सेतू अभ्यासक्रमाच्या पीडीएफ पोहोचवल्या आणि सर्व स्वाध्याय पेपर सोडून घेतले. यावरून त्या शिक्षकांची विद्यार्थ्याप्रति तळमळ दिसून येते
" यावर्षी जि. प. च्या मराठी शाळा आणि खाजगी माध्यमाच्या अनुदानित शाळांची पटसंख्या वाढली आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग तत्पर आहेत. सध्या सुरू असलेला सेतू अभ्यासक्रम सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आमच्या शिक्षकांनी पोहचवला आहे "
गजानन परांडे गटशिक्षणाधिकारी पं. स. मालेगांव