शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पोटात चाकू भोसकून इसमास केले गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 6:55 PM

महिलेच्या मामास पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : तालुक्यातील वरोली येथे पाहुणी आलेल्या महिलेवर एका युवकाने प्रेम व्यक्त केले. त्यास संबंधित महिलेने नकार दिला. तसेच याच कारणावरून झालेल्या वादात आरोपीने फिर्यादी महिलेच्या मामास पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी आरोपी युवकास अटक केली आहे.याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ती वरोली येथे पाहुणी म्हणून आली होती. यादरम्यान आरोपी संतोष सुधाकर नाटकर याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हटले. त्यावरून संतप्त झालेल्या महिलेने आरोपीस चांगलेच फटकारले. यामुळे दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. तो सोडविण्यासाठी फिर्यादीचा भाऊ व मामा मधस्ती करित असताना आरोपी संतोष नाटकर याने त्याच्या हातातील चाकू मामाच्या पोटात मारुन जखमी केले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आरोपी संतोष सुधाकर नाटकर याच्याविरुध्द भादंविचे कलम ३२६, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास एएसआय मनोहर नागरीकर,  जगन्नााथ घाटे करित आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी