संकटाच्या काळात नाफेडकडून हरभरा खरेदी बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 1:30 PM
गोदामात जागा नसल्याचे कारण : शेतकरी हवालदिल
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हरभरा साठवण्यासाठी गोदामात जागाच शिल्लक नसल्याचे कारण समोर करून नाफेडने शेतमाल खरेदी बंद केली आहे. परिणामी, हरभरा उत्पादक शेतकरी हैराण झाले असून ऐन खरीप हंगामात ओढवलेली ही समस्या तत्काळ निकाली काढून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.शिरपूर परिसरातील गावांसह मालेगाव तालुक्यातील इतर गावांमध्ये हरभरा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. दरम्यान, बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने जिल्ह्यात शेतकºयांचा हरभरा नाफेडमार्फत खरेदी केला जात आहे; मात्र गोदामात हरभरा साठविण्यासाठी आता जागाच शिल्लक नसल्याचे कारण समोर करून मालेगाव तालुक्यामध्ये नाफेडने हरभरा खरेदी करणे बंद केले. विशेष गंभीर बाब म्हणजे मालेगाव येथील वखार महामंडळाच्या गोदामात मंगरूळपीर आणि वाशिम तालुक्यातील हरभरा खरेदी करून करून साठविला जातो. परिणामी, मालेगाव तालुक्यातील शेतकºयांचा हरभरा खरेदी करून साठवून ठेवण्याकरिता गोदामात आजरोजी जागाच शिल्लक राहिलेली नाही. उद्भवलेल्या या बिकट अडचणीमुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांना पैशांची गरज असताना जवळ असलेला शेकडो क्विंटल हरभरा मिळेल त्या दराने खासगी व्यापाºयांना विकावा लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन गोदामात जागा उपलब्ध करावी आणि मालेगाव तालुक्यातील शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे..................वाशिम आणि मंगरूळपीर तालुक्यातील शेतकºयांकडून हरभरा खरेदी केल्यानंतर तो गोदामात साठविण्यात आला. यामुळे मालेगाव येथील वखारच्या गोदाम सद्या जागा शिल्लक राहिलेली नाही. असे असले तरी हरभरा साठवणूकीसाठी आणखी काही गोदाम भाड्याने घेण्यात आले आहेत. यासह वखारच्या गोदामातील मालही लवकरच हटविण्यात येणार असून सोमवारपासून हरभरा शेतमालाची खरेदी पुर्ववत सुरू करण्यात येईल. शेतकºयांनी संयम बाळगावा.- सचिन पवारमार्केटिंग अधिकारी, अकोला