...............
‘त्या’ अधिनियमाची अंमलबजावणी करा
वाशिम : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्व तपासणी, मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने बुधवारी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली.
...............
वृद्ध कलावंत आर्थिक अडचणीत
वाशिम : वृद्ध साहित्यिक व कलावंतांना नोव्हेंबर २०२० पासून मानधनच मिळाले नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात ५९२ वृद्ध कलावंत असून, मानधन केव्हा मिळणार याकडे लक्ष लागून आहे.
................
स्मशानभूमी, ग्रा.पं. भवनाचा प्रश्न निकाली
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जवळपास १५ कोटींचा अतिरिक्त निधी मिळाल्याने जिल्ह्यातील स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवनाचा प्रश्न निकाली निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
............
प्रत्येकाच्या तोंडावर दिसतोय ‘मास्क’
वाशिम : कोरोनाचा आलेख गेल्या काही दिवसांपासून चढला आहे. यामुळे तोंडाला मास्क नसल्यास ५०० रुपये दंड केला जात आहे. कारवाईच्या धास्तीने प्रत्येकाच्या तोंडावर आता ‘मास्क’ असल्याचे पाहावयास मिळत आहे.
.............
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित
वाशिम : शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया लालफीतशाहीत अडकल्याने जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध संघटना मध्यंतरी आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचे संकट उद्भवल्याने हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.
...............
शिष्यवृत्तीसंदर्भात माहिती सादर
वाशिम : शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने माहिती मागितली होती. ती वेळेत पाठविण्यात आली असून परीक्षा घेण्याबाबत अद्याप कुठलेही निर्देश नसल्याची माहिती शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.
...............
वीज जोडणी देण्याची मागणी
वाशिम : पंचाळा बळीराजा लघु प्रकल्पात मुबलक जलसाठा असतानाही, केवळ वीजजोडणी नसल्यामुळे परिसरातील ५५० हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहत आहे. वीज जोडणी देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
.............
आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
वाशिम : तालुक्यातील कोरोनाविषयक स्थिती आणि संभाव्य लसीकरण यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी २५ फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांकडून आढावा जाणून घेतला.