लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सरसकट कर्जमाफीसह शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढा, या मुद्यावरून आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.वाशिम येथील वाशिम-अकोला महामार्गावरील जिजाऊ चौकात कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मालेगाव येथील शेलू फाट्यावर आमदार बच्चू कडू सर्मथकांनी शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत रास्ता रोको केला. ३0 जून २0१७ पयर्ंत कर्ज थकीत असणार्या शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला योग्य हमीदर द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात गजानन बोरचाटे, विजय शेंडगे, भगवान बोरकर, अजय घुगे, महादेव बोरचाटे, दत्ता बोरचाटे, गजानन शिंदे, संतोष पवार, ओम चतरकर, हरिभाऊ लहाने, किशोर देवळे, गोपाल पवार, राजू गायकवाड, विलास तांबेकर, बालाजी टाले, किशोर शिंदे, विशाल सदार, अतुल ठाकरे, नागेश गरकळ, नितीन बोरचाटे, अनिकेत अंभोरे, ओम गायकवाड, गजानन अंभोरे, पप्पू अंभोरे, विनोद गायकवाड, पवन पाटील, आकाश खवले, प्रभाकर बोरचाटेंसह शेकडो शेतकर्यांची उपस्थिती होती. यादरम्यान मालेगाव-वाशिम, मालेगाव-शेलूबाजार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.कामरगाव (ता.कारंजा) येथे शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुकाणू समितीच्यावतीने शेतकर्यांनी रास्ता रोको केला. यावेळी सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध करून, नंतर त्यांची सुटका केली. या आंदोलनात भारत भगत, रवींद्र दोरक, भागवत मुंदे, सचिन मुंदे, श्रीकृष्ण र्मदाने, संदेश इंगळे, प्रकाश खेडकर, अंबादास भोने, परशूराम सुरजुसे, डिगांबर पवार, चेतन मुंदे, राधेशाम ठाकरे, जनार्दन पांडे, शाहरूख अली, अहमद शेख, व्दारकाबाई जवंजाळ यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथील शेतकर्यांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी १४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे शेकडो वाहनांची रांग लागली होती. आंदोलनात भगवानराव पाटील, बाळकिसन बर्डे, किशोर कड, दशरथ शेळके, विठ्ठल कड, शंकर इढोळे, माधव जाधव, रामधन कड, बळीराम गोरे, बद्रीनाथ गोटे, ज्ञानबा कड, विष्णू बर्डे, महेश कड, अरविंद कड, शंकर मुळे, नाजूक हिवाळे यांच्यासह शेकडो शेतकर्यांनी सहभाग नोंदविला.
शेतकर्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाभरात रास्ता रोको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 1:14 AM
वाशिम: सरसकट कर्जमाफीसह शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढा, या मुद्यावरून आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.
ठळक मुद्देकर्जमाफीसह शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढाजिल्ह्यात विविध ठिकाणी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले.रास्ता रोको आंदोलन