लोकमत न्यूज नेटवर्करिसोड - शेतकरी संपाच्या समर्थनार्थ शिवसेनेच्यावतीने ६ जून रोजी रिसोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग लागू करणे, शेतमालाला हमीभाव देणे, शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करणे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जून पासून राज्यातील विविध भागातील शेतकरी संपावर आहेत. सलग पाच दिवस शेतकरी संपावर असतानाही, ठोस आश्वासन देण्यात न आल्याने शेतकरी संप सुरूच आहे. या संपाच्या समर्थनार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये व खासदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांच्या नेतृत्त्वा शिवसेना शहर शाखेच्यावतीने रिसोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, शहर प्रमुख अरूण मगर, युवा सेना तालुका प्रमुख अॅड. गजानन अवताडे, उपतालुकाप्रमुख शिवाजी अवताडे, नंदु देशमुख, शिवाजी खानझोडे, डॉ. ज्ञानबा वाकळे, मधुकर जाधव, पंचायत समिती सदस्य नंदू घुगे, किशोर करंगे, प्रकाश चोपडे, बळीराम चोपडे, सतीश घोटे, आनंदा कुलाळ, गजानन गव्हाणे, शालिक गव्हाणे, मधुकर जाधव, मोबीनभाई, राजू घुगे, रामेश्वर जायभाये, पेंटर थोरात, थोरात महाराज, नसरोद्दीनभाई यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.