लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील श्री नाथ नंगे महाराज संस्थान येथील भव्य यात्रा महोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी महाप्रसाद वितरणाने झाली. ५0 ट्रॅक्टरद्वारे २00 क्विंटल महाप्रसादाचे वितरण भाविकांना करण्यात आले. विदर्भाची पंढरी म्हणून डव्हा संस्थांचा उल्लेख केल्या जातो. दरवर्षी रथसप्तमीला भव्य यात्रेचे आयोजन असते. नाथ नंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. या यात्रेची सुरुवात १८ जानेवारी रोजी झाली होती. २४ जानेवारीला यात्रोत्सवाची सांगता झाली. ७५ क्विंटलपुरी, १५ क्विंटलची बुंदी, ५0 क्विंटलची भाजी असा महाप्रसाद जवळपास एक लाख भाविकांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने वितरित करण्यात आला. जवळपास दोन हजार स्वयंसेवकांनी सहकार्य केले. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर श्री नाथ नंगे महाराज व विश्वनाथ महाराज यांच्या मूर्तीचे पूजन अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. दुपारपयर्ंत विविध धार्मिक कार्यक्रम, यज्ञ झाल्यानंतर वाजतगाजत पालखी सोहळा पार पडला. मंदिरापासून पालखी निघून दुपारच्या सुमारास १२ एकर जमिनीवर भाविकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. ध्वजारोहण झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत महाराजांच्या नावाचा एकच गजर करीत महाप्रसाद वितरण करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जवळपास एक लाख भाविक डव्हा येथे दाखल झाले होते.यावेळी आमदार अमित झनक, श्यामसुृंदर मुंदडा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, तहसीलदार राजेश वझिरे, जिल्हा परिषदेचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे, सेवाराम आडे, नायब तहसीलदार राठोड, गोपाल पाटील राऊत, विश्वंभर नवघरे, सुभाष घुगे, उल्हास घुगे, संस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष बाबूराव माणिक घुगे, ज्ञानेश्वर खरबडे, डॉ. निवास मुंढे, सुरेश घुगे, सीताराम खानझोडे, नारायण घुगे, प्रभुराव घुगे, गोवर्धन राऊत, कैलाश देशमुख, अजयसिंग राजुरकर, दिलीप वाघ, सुभाष घुगे, गोविंद पुरोहित, पुरुषोत्तम देवळे आदी मान्यवर उपस्थित होते. यात्रा महोत्सवादरम्यान विश्वजीवन ग्रंथाचे पारायण, हरिकीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यात्रा महोत्सवात रोगनिदान शिबिर, जागृती शिबिर पार पडले.
महाप्रसाद वितरणासाठी शिस्तबद्ध नियोजनमहाप्रसाद वितरणासाठी संस्थानने शिस्तबद्ध नियोजन केले होते. यात्रा महोत्सवाच्या आयोजनासाठी संस्थानचे अध्यक्ष बाबूराव घुगे, विश्वस्त डॉ. निवासराव मुंढे, गोवर्धन महाराज , सुरेश घुगे , ज्ञानेश्वर खरबडे ,प्रभुराव घुगे यांच्यासह अँड. सुभाष घुगे आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, या यात्रोत्सवानिमित्त श्रीमद् भागवत सप्ताह व विश्वजीवन ग्रंथ सामुदायिक पारायणास झाले. यात्रा महोत्सवात गायत्री जप, श्री विश्वनाथ महाराजकृत अभिषेक व हवन वेदशास्त्र संपन्न शशिकांत देव यांच्या आचार्यत्वाखाली झाले. नारायण महाराज खडकीकर यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत वाचन करण्यात आले. हरिनाम सप्ताह सीताराम महाराज खानझोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. श्री विश्वजीवन ग्रंथ व्यासपीठ, गोवर्धन महाराज राऊत यांनी सांभाळले. या भागवताच्या समाप्तीनिमित्त सीताराम महाराज खानझोडे आसेगाव पेन यांचे काल्याचे कीर्तन झाले आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने २४ जानेवारीला प्रकाशित केलेल्या ‘तुझे तुलाच’ या विशेष पानाचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.ं