मास्क, सॅनिटायझर विक्रीमध्ये घट
वाशिम : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून प्रत्येकजण पूर्वी मास्क व सॅनिटायझरचा वापर करत हाेता. काेराेना संसर्ग कमी हाेताच मास्क, सॅनिटायझर विक्रीत घट झाल्याची माहिती औषध विक्रेत्यांकडून देण्यात आली.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत घट हाेत आहे. परंतु काेराेना संसर्ग पूर्णपणे संपुष्टात आला नाही. याकरिता नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.
सौरपंप योजनेचा लाभ देण्याची मागणी
वाशिम : सिंचनासाठी सौर पंपाची जोड मिळावी याकरिता कृषी सौरपंप योजना राबविण्यात येत आहे. काही तांत्रिक कारणामुळे या योजनेत मालेगाव तालुक्याचा समावेश झाला नाही. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी हाेत आहे.
थकीत देयक अदा करण्याचे आवाहन
वाशिम : ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनांचे कोट्यवधी रुपयांचे विद्युत देयक थकीत आहे. यामुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून देयक अदा करण्याचे आवाहन करण्यात आले