संचारबंदीच्या सुधारित आदेशानुसार मेडिकल व दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील उर्वरित सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. यानुसार दवाखाने, मेडिकल्स २४ तास सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवेतील उर्वरित दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहत आहेत. ११ वाजतानंतर शहरातील सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद ठेवण्याचे आदेशाने मंगरूळपीर शहरात २२ एप्रिल रोजी दुपारी सर्वत्र मार्केट बंद झाल्यामुळे तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर कारवाईचे आदेश आल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांनी घरात राहणे पसंत केले. त्यामुळे शहरात दुपारी सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले. लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हे शहरांत फिरून लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी न करता नियम पाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगरूळपीर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:44 AM