लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील काही शहरांत मोडकळीस आलेल्या इमारतींचा सर्व्हे गत दोन वर्षांपासून करण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.सन २०११-१२ या वर्षी रिसोड पालिकेच्यावतीने ३० वर्षांपेक्षा अधिक झालेल्या इमारतींचे सर्वेक्षण केले होते. यावेळी दोन इमारती जीर्ण आढळल्याने त्या पाडण्यात आल्या. तेव्हापासून सर्वेक्षण झाले नाही. तीन वर्षांपासून ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ झाले नाही. यासंदर्भात रिसोड नगर पालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता सुधाकर देशमुख म्हणाले, की रिसोड शहरातील इमारतींचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येईल. जीर्ण आढळलेल्या इमारती पाडण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील. धोकादायक इमारत आढळल्यास संबंधितांना नोटिस दिली जाईल. तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाईदेखील केली जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. मानोरा शहरातदेखील दोन वर्षांपासून सर्वेक्षण झाले नाही. मानोरा शहरात काही इमारती व शासकीय कार्यालय व निवासस्थाने मोडकळीस आल्याचे दिसून येते. सिंचन विभाग, पोलीस विभागाची निवासस्थाने, जुनी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालेगाव शहरातदेखील धोकादायक किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींचा सर्व्हे झाला नाही. दोन वर्षांपासून ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ झाले नाही. मंगरूळपीर शहरात सन २०१५-१६ या वर्षात नगर परिषदेतर्फे धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले असता, एकूण सहा इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या. चालू वर्षात पालिकेने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले नाही. शहरातील काही निवासी इमारती, शासकीय निवासस्थाने व कार्यालयांच्या इमारतींचीसुद्धा दयनीय अवस्था आहे. नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाची इमारतच मोडकळीस आल्याचे दिसून येते. पंचायत समिती कार्यालयाला लागूनच ही इमारत आहे. येथे होमगार्ड कार्यालयदेखील आहे. ही इमारत इंग्रजकालीन पद्धतीने बांधण्यात आली असून, त्यास अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत.
जीर्ण इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:30 AM
वाशिम : जिल्ह्यातील काही शहरांत मोडकळीस आलेल्या इमारतींचा सर्व्हे गत दोन वर्षांपासून करण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यातील चित्र : मोडकळीस आलेल्या इमारती धोकादायक अवस्थेत