शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

‘त्या’ आरोपी ‘बीडीओं’ची जामीन मिळविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:33 AM

वाशिम : जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा (ता. मालेगाव) येथून जवळच असलेल्या मारसूळ येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या ...

वाशिम : जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा (ता. मालेगाव) येथून जवळच असलेल्या मारसूळ येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाला. याप्रकरणी विशेष पथकांमार्फत करण्यात आलेल्या चौकशीअंती तब्बल २ वर्षांनंतर तीन तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांसह १४ जणांवर ३१ डिसेंबर २०२० रोजी मालेगाव पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले; मात्र ८ दिवस उलटूनही सर्वच आरोपी अद्याप फरार असून दोन आरोपी बीडीओंनी अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता धडपड चालविल्याची माहिती आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मारसूळ येथे २०१७-१८ मध्ये ८१ व २०१८-१९ मध्ये १९ अशी १०० कामे करण्यात आली. त्यात वैयक्तिक शौचालय, शेततळे, शोषखड्डा, सार्वजनिक वृक्षलागवड, नाला सरळीकरण, खोलीकरण अशा प्रकारच्या कामांचा समावेश होता. या कामांमध्ये आरोपींनी शासनाची दिशाभूल करून ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे चौकशीअंती सिद्ध झाले. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून मालेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माधव साखरे यांनी ३१ डिसेंबर रोजी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून तत्कालिन गटविकास अधिकारी संदीप रामचंद्र कोटकर, कुलदीप कालीदास कांबळे, संजय नामदेव महागावकर, कनिष्ठ अभियंता कैलास नारायण मगर, तांत्रिक कंत्राटी अधिकारी पवन उमेश भुते, सहायक लेखा अधिकारी सुभाष मोतीराम इंगळे, सहायक कार्यक्रम अधिकारी योगेश्वर श्रीकिसन तागतोडे, संगणक परिचालक विनोद संभाजी आगाशे, सागर गजानन इंगोले, ग्रामसेवक संतोष मदन खुळे, ग्रामसेविका सोनल बळीराम इंगळे, नीलेश काशीराम ढंगारे, रोजगारसेवक शत्रुघ्न लोडजी खिल्लारे आणि ब्राम्हणवाडाचे सरपंच पंजाबराव वामन घुगे अशा १४ जणांवर भादंविचे कलम ४०६, ४२०, ४६५, ६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

..................

बॉक्स :

आरोपीच्या शोधात विशेष पथक रवाना

८ दिवसांपूर्वी गुन्हे दाखल होऊनही याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही; तर कुलदीपक कालीदास कांबळे आणि संजय नामदेव महागावकर या तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, संदीप रामचंद्र कोटकर यांच्या शोधात पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी दिली.