जिल्ह्यात मान्सूनचे धडाकेबाज आगमन झाले आहे. गेल्या ८ जूनपासून पाऊस पडत असून, १३ जूनचा अपवाद वगळता प्रत्येक दिवशी विविध भागांत पाऊस पडत आहे. पावसाचा जोरही चांगला असून, वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, वीज खांब कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. वीज खांब झुकल्याने आणि उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महावितरणने हे खांब सरळ करण्याची मोहीमच सुरू केली आहे. जिल्ह्यात जवळपास २८ पेक्षा अधिक वीज खांब गुरुवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सरळ केले. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासाही मिळाला आहे. गुरुवारी मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना मोरेसह रिसोड तालुक्यातील रिठद आणि इतर ठिकाणचे वीज खांब सरळ करण्यात आले.
वादळी वाऱ्याने झुकलेले खांब सरळ करण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:28 AM