वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जि. प. शाळेच्या शिक्षकांना अर्ज सादर करण्याचा विसर पडल्याने या शाळेतील विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेपासून वंचित राहिले आहेत. या गंभीर प्रकाराची तक्रार पालकांनी जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकाºयांकडे केली असून, याची चौकशी करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, त्यांचा शैक्षणिक खर्च वाचावा, या उद्देशाने शासनाच्यावतीने नवोदय शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांत प्रवेशासाठी पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्यात येते. त्यासाठी शाळांना नवोदयकडे अर्ज सादर करावे लागतात. यंदाही ही प्रक्रिया पार पडली; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या परिक्षेस विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज सादर करण्याचाच विसर पडला. त्यामुळे अर्ज करण्याची मुदत निघून गेली आणि यामुळेच संबंधित शाळेतील गुणंवत विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेला मुकणार आहेत. शिक्षण विभाग आणि जोगलदरी शाळेतील शिक्षकांचा बेजबाबदारपणा आणि दिरंगाईच या गंभीर प्रकाराला कारणीभूत असल्याचा आरोप पालकवर्गातून होत असून, या प्रकाराची चौकशी करून संबंधित सर्व शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाºयांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सरदार राठोड यांच्यासह इतर पालकांनी ही तक्रार केली असून, याची दखल न घेतल्यास येत्या १० जून रोजी मंगरुळपीर-मानोरा मार्गावर जोगलदरी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शिक्षकांच्या दिरंगाईमुळे नवोदयच्या परिक्षेपासून विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:17 PM
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जि. प. शाळेच्या शिक्षकांना अर्ज सादर करण्याचा विसर पडल्याने या शाळेतील विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेपासून वंचित राहिले आहेत.
ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या परिक्षेस विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज सादर करण्याचाच विसर पडला. अर्ज करण्याची मुदत निघून गेली आणि यामुळेच संबंधित शाळेतील गुणंवत विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेला मुकणार आहेत. या प्रकाराची चौकशी करून संबंधित सर्व शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.