लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगाव येथे चलायमान विज्ञान प्रदर्शनीचा परिसरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापीका एस.डी.क-हाळे यांनी केले. शाळेचे सदस्य रामचंद्र अंभोरे तर शिक्षकांमधून जी.के.गायकवाड, एस.यु.गोटे, पि.के.सरनाईक यांनी आलेल्या शाळांचे प्रदर्शनी पाहण्यासाठी योग्य नियोजन केले होते. यावेळी इयत्ता आठवी ते बारावीच्या २४ विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची कार्य केले. सदर प्रदर्शनीचा लाभ परिसरातील हनुमान विद्यालय उकळीपेन, जि.प. व शाळा, सुकळी, जि.प.शाळा राजगाव, श्रीकृष्ण विद्यालय, तोंडगाव, स्व.नामदेवराव राजगुरु विद्यालय धुमका, जि.प.हायस्कुल कनेरगाव नाका , महात्मा फुले विद्यालय, कनेरगाव इत्यादी जि.प.व शाळा उकळीपेन शाळांनी घेतला. यशस्वीतेसाठी एस.बी.अंभोरे, राजे गोटे, इंगोले, कव्हर, बाजड, विश्वंभर काळबांडे, डाखोरे , काष्टे, यांनी परिश्रम घेतले.
राजगाव येथे विद्यार्थ्यांनी घेतला चलायमान विज्ञान प्रदर्शनीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 6:06 PM
वाशिम : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगाव येथे चलायमान विज्ञान प्रदर्शनीचा परिसरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापीका एस.डी.कºहाळे यांनी केले.
ठळक मुद्देश्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगाव