मंगरूळपीर: विद्यार्थ्यांनी अंधश्रध्देकडे न वळता वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वक्ते निलेश रमेश मिसाळ यांनी केले. ते मंगरुळपीर येथिल यशवंतराव चव्हाण विद्यालयात आयोजित ‘वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रद्धा निर्मूलन’ याविषयावरील आयोजित व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यशवंतराव चव्हाण विद्यालयात व्याख्यानासह विविध खेळ स्पर्धा, उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांचे बौद्धिक विकासाकरीता अंधश्रद्धा निर्मुलन अंतर्गत चमत्कारांमागिल विज्ञान या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सुडकेतर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक आगरकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वाशिम जिल्हाध्यक्ष नाना देवळे , अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे वक्ते निलेश रमेशराव मिसाळ होते. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते महान विज्ञाननिष्ठ संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले.
या व्याख्यानात अंधश्रद्धांचे प्रकार, व्याप्ती, त्यांचे परीणाम, अंधश्रद्धा निर्मुलन म्हणजे काय? भुत व भुताचे मानसशास्त्र., भानामती-करणी करता येते काय? त्यामागील रहस्य, फलजोतिष्य किती खरे किती खोटे? संत चमत्कार आणि बुवाबाजी, जादुटोणा-चमत्कारांमागील विज्ञान, बुद्धिप्रामाण्यवाद व वैज्ञानिक दृष्टीकोन, विविध चमत्कार प्रयोगांचे सादरीकरण व त्यामागिल वैज्ञानिक कारणमिमांसा मान्यवरांनी सांगितली. तसेच महाराष्ट्र शासनाचा ' जादुटोणा विरोधी कायदा' या बाबत सविस्तर मार्गदर्शन करतांना कायद्याची माहीती, भुमिका, पार्श्वभुमी, कलमे, व्याप्ती, मर्यादा, अनुसुची, यासह कायद्याचा योग्य वापर या विषयांवर सर्वांना सखोल मार्गदर्शन केले. ढोंगी बुवा-बापुंपासून जनतेने सावध रहावे असे आवाहन केले.
प्रमूख अतिथी शाळेचे जेष्ठ शिक्षक आगरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुडके यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन कु. स्नेहल आडे तर आभार प्रदर्शन कु. अंशु वाघमारे या विद्याथीर्नींनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता शिक्षक महेंद्र हिवराळे, , विटकरे, इंगोले, राऊत, पोहाणे, तायडे, पाटील, फूके, ठाकरे, कटारे, सोमकांत पाटील,अरूण गाढवे, नारायण शेळके, बापूराव मोटे, शिवम ठाकरे , शिक्षीका तलवारे, रघुवंशी, इंगोले, देशमुख यांच्यसह सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.