वाशिम: स्थानिक विद्याभारती प्राथमिक विद्यालयाच्यावतीने क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी वाशिम पोलीस स्टेशनची भेट घडवून आणली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपद्धती आणि इतर जबाबदारीची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मनात पोलीस प्रशासनाबाबत असलेली भिती, गैरसमज दूर व्हावे, त्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळावी, या उद्देशाने विद्याभारती शाळेच्यावतीने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांना वाशिम पोलीस स्टेशनची भेट घडविण्यात यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांचे शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर ठाणेदार पाटकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांच्या मनातील शंकांचे योग्य पद्धतीने निरसन केले. त्यानंतर जमादार उमाकांत केदारे यांनी विद्यार्थ्याना पोलिसांच्या शस्त्रांसह पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी पोलीस स्टेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक नितेश मिटकरी यांनी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आणि ठाणेदारांचे मनपूर्वक आभार व्यकत केले. या क्षेत्रभेटीसाठी शाळेचे संचालक विजय गोटे, आंबटकर, वाडेकर, निमके, लावरवार, प्रतिभा पºहाते, भिसडे आदिंनी सहकार्य केले.