लोकमत न्यूज नेटवर्क अनसिंग: समाजात शांतता आणि जातीय सलोखा कायम राहावा, या उद्देशाने ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता येथे सद्भावना दौड स्पर्धा घेण्यात आली. त्यात परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून हा उपक्रम यशस्वी केला. अनसिंग परिसरात प्रथमच सदभावना दौड स्पर्धा घेण्यात आली. त्याचे उद्घाटन सरपंच सिंधूताई विठ्ठल सातव यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. यावेळी ठाणेदार गणेश भाले, सहायक पोलिस उपनिरीक्षक योगीता भारव्दाज, माजी जि.प.सदस्य पांडूरंग ठाकरे, प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाणे, हाजी महंमद खान, सै. हुसेन, सचिव एम.बोडखे, आल्हाद रोकडे, गजानन वलाले, विठ्ठल सातव, संजय शिंदे, बाळ नवलगणकर, नारायण इंगळे, माधव बोंद्रे, प्रा.सचिन बिच्चेवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या सदभावना दौड स्पर्धेत सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात १४ वर्षाआतील वयोगटात मुलींमधून नेहा अशोक ठाकरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. दिपाली मंचक उंदरे हिने व्दितीय; तर कोमल साबू हिने तृतीय क्रमांक मिळविला. मुलांमधून अनुक्रमे मयूर विलास राऊत, संदेश काळुराम चव्हाण, तनविर अनिल आडे, कुणाल भालेराव, मारोती नागरे, तसेच १८ वर्षाच्या आतील मुलांमध्ये सचिन रमेश भुसारे, सौरव मधुकर राठोड, गोविंद संतोष चव्हाण ज्ञानेश्वर गजानन गाडेकर, रुतीक संजय पवार यांनी यश पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पोलिस प्रशासनाच्यावतीने उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
‘सद्भावना दौड’मध्ये धावले विद्यार्थी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:20 AM
अनसिंग: समाजात शांतता आणि जातीय सलोखा कायम राहावा, या उद्देशाने ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता येथे सद्भावना दौड स्पर्धा घेण्यात आली. त्यात परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून हा उपक्रम यशस्वी केला.
ठळक मुद्दे अनसिंगमध्ये उपक्रम पोलीस प्रशासनाचा पुढाकार