शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

विद्यार्थ्यांंनी साकारला गांडूळ खत, जलपुनर्भरण प्रकल्प!

By admin | Published: May 07, 2017 2:01 AM

शिक्षकांचे प्रोत्साहन; राष्ट्रीय हरितसेनेचा पुढाकार.

वाशिम : पाणीसमस्येवर मात करणे तसेच दज्रेदार पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी निश्‍चित उपाय ठरणार्‍या "रेन वॉटर हार्वेस्टिंग" व गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी येथील एस.एम.सी. इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांंंनी केली असून, अशाप्रकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणारी ही जिल्हय़ातील एकमेव शाळा ठरली आहे. दिवसेंदिवस घटत चाललेल्या पर्जन्यमानामुळे जलपुनर्भरण काळाची गरज ठरली असून, दज्रेदार शेतमालाच्या उत्पादनासाठी गांडूळ खताचे महत्त्व आणि त्याची अत्यावश्यक गरज पाहता एस.एम.सी. इंग्लिश स्कूलमधील राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांंंनी हे दोन्ही प्रकल्प साकारण्याचा उपक्रम हाती घेतला. संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ क्षीरसागर व प्राचार्य मीना उबगडे यांच्या नेतृत्वात तसेच हरितसेनेचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांंंनी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि गांडूळखत या दोन्ही प्रकल्पांची निर्मिती केली.मागील काही वर्षांंंपासून सातत्याने पर्यावरणाचा र्‍हास होत असून, यामुळे पावसाचे प्रमाण घटत असून, भूजल पातळीसुद्धा कमालीची खाली जात असून, यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरत आहे. दुसरीकडे शेतजमिनीचा कस देखील खालावत असून, पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. याशिवाय हाती पडणारे उत्पादन निकृष्ट दर्जाचे होत असल्याने यामुळे शेतकर्‍याना आद्गथक फटका सोसावा लागत आहे. एस.एम.सी.स्कूलमधील हरितसेनेच्या विद्यार्थ्यांंंनी ही बाब हेरुन शाळेच्या परिसरातील वाहून जाणारे पावसाचे पाणी पाइपलाइनद्वारे शोषखड्डा तयार करुन, त्यात तसेच विंधन विहिरीत सोडले आहे. परिसरातील पालापाचोळा, काडीकचरा गोळा करून गांडूळखत निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नामुळे शहरातील लाखाळा परिसरातील पाण्याच्या पातळीमध्ये हमखास वाढ होऊन संभाव्य पाणीटंचाईवरही मात करता येणार आहे. एस.एम.सी. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उभारलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग व गांडूळ खत या दोन्ही प्रकल्पास शासकीय तंत्र विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली.