मेडशी (वाशिम) : वन विभाग, मालेगाव आणि वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेच्या वतीने स्थानिक सनराईज कनिष्ठ महाविद्यालयात २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच वृक्षलागवड आणि त्यांच्या संगोपनाची शपथ घेतली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य भालेराव होते. मालेगाव वनपरीक्षेत्र अधिकारी सिद्धार्थ वाघमारे, वस्तगुल्म जैवविविधता संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम इंगळे, शिवाजी बळी, जितेंद्र खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांना रोपांची भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. जैवविविधता संवर्धन हे केवळ वनविभागापुरते किंवा झाडे लावणे व जगवणे यापुरते मर्यादित नसून त्याचे महत्व प्रत्येकाने ओळखायला हवे आणि त्यादृष्टीने प्रत्यक्ष कृती देखील व्हायला हवी, अशी अपेक्षा वन परिक्षेत्र अधिकारी वाघमारे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप इंगळे यांच्या मनोगताने झाला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आनंदाच्या प्रसंगी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली. तसेच राष्ट्रीय हरित सेनेचे सभासदत्व नोंदणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालेगाव वन परिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक सुनील तायडे, संजय राठोड, उमेश राऊत, सचिन भिसे, वनरक्षक तायडे, कुटे, पवार, डहाके, सोनवणे, सानप, सरकटे, झुंजारे, देवढे, बोबडे, राठोड, देवकर यांनी पुढाकार घेतला.
विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षलागवड, संवर्धनाची शपथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 5:28 PM
मेडशी (वाशिम) : वन विभाग, मालेगाव आणि वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेच्या वतीने स्थानिक सनराईज कनिष्ठ महाविद्यालयात २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देस्थानिक सनराईज कनिष्ठ महाविद्यालयात २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यात आला.प्रारंभी उपस्थित मान्यवरांना रोपांची भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आनंदाच्या प्रसंगी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली.