शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची प्रतीक्षा !

By admin | Published: July 05, 2017 1:15 AM

जिल्ह्यातील वास्तव: निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचे खाते अद्यापही अप्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: शासनाने यंदाच्या सत्रापासून मोफत गणवेश योजनेतंर्गत १ ली ते आठवीपर्यंतच्या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शाळेच्या सत्रापूर्वीच ही रक्कम विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित असताना आता यंदाचे सत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरी, अद्याप निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचे खाते अप्राप्त असल्याने जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.शालेय शिक्षण विभागाच्यावतीने वर्ग पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दरवर्षी दोन मोफत गणवेशाचे वितरण करण्यात येत होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्ती जनजाती, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनींना होतो; परंतु यंदाच्या सत्रापासून सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश वितरण न करता थेट त्यांच्या खात्यात प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे दोन गणवेशासाठी ४०० रुपये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यासाठी विद्यार्थी आणि त्याच्या आईचे संयुक्त बँक खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, केवळ चारशे रुपयांसाठी पाचशे रुपये खर्चून नवे खाते उघडणे परवडणारे नसतानाच शून्य जमा रकमेचे खाते अर्थात झीरो बॅलेन्स अकाउंट उघडण्यात अनेक पालकांना अडचणी येत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून बँके त खरिपाच्या पृष्ठभूूमीवर कर्ज वितरणाची सुरू असलेली प्रक्रिया खाते उघडण्यात अडचणी निर्माण करीत आहेत. या सर्व कारणांमुळे अद्यापही जिल्ह्यातील निम्म्या विद्यार्थ्यांचे खाते शाळांकडे सादर झाले नाहीत. परिणामी, आठवडा उलटला तरी शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. दरम्यान, यंदाच्या सत्रात सदर गणवेशाची रक्कम शाळा मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करून विद्यार्थ्यांना गणवेश वितरणासाठी परवानगी देण्याची मागणी जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केली होती; परंतु त्यांची मागणी अद्यापही मान्य होऊ शकली नाही. त्यामुळे नव्या गणवेशाविनाच विद्यार्थ्यांचे यंदाचे सत्र सुरू झाले आहे. पालकांच्या खात्यात रक्कम जमा करावी! शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त खात्यात गणवेशाची रक्कम भरण्यात खातेक्रमांकाअभावी अडचणी येत असताना. नवे खाते उघडण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात ही रक्कम जमा करावी, जेणेकरून या योजनेची अंमलबजावणी होऊन विद्यार्थ्यांनाही गणवेशही मिळतील, अशी मागणी पालकवर्गाकडून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे, तर मोफत गणवेश विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या खात्यात रक्कम जमा करावी, अशी मागणी शाळांकडून करण्यात येत आहे; परंतु या दोन्ही मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाही.