शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

विद्यार्थ्यांना उद्या मिळणार जंतनाशक गोळी ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 7:31 PM

१ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना आतड्याचा कृमीदोष होऊ नये या दृष्टिकोनातून २८ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.

ठळक मुद्दे१ ते १४ वर्ष वयोगटातील ६८ टक्के बालकांमध्ये आतड्याचा कृमीदोष आढळतोजिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जवळपास २ लाख मुला-मुलींना दिली जाणार जंतनाशक गोळी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना आतड्याचा कृमीदोष होऊ नये या दृष्टिकोनातून २८ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.वैयक्तिक व परिसर स्वच्छतेच्या अभावाने कृमीदोष उद्भवू शकतो. मातीतून प्रसारित होणा-या जंतांमुळे १ ते १४ वर्ष वयोगटातील ६८ टक्के बालकांमध्ये आतड्याचा कृमीदोष आढळतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली. बालकांमध्ये आढळणारा कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. तसेच यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. आतड्याच्या कृमीदोषाचे मूळ हे जंतांमध्ये असून, या जंतांचा नाश करण्यासाठी जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनी अर्थात १८ आॅगस्ट रोजी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याची मोहिम राबविण्यात आली. या दिवशी ज्या बालकांना जंतनाशक गोळी मिळाली नाही, जे बालक गैरहजर होते, त्यांना २३ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळी द्यावी लागणार होती. परंतू, शासनाने यामध्ये बदल केला असून, सुधारित धोरणानुसार आता २८ आॅगस्ट रोजी एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागात ८३६ शासकीय, २७३ शासकीय अनुदानित व ३२ खाजगी अनुदानित अशा एकूण ११४१ शाळा, तसेच १०६४ अंगणवाडी केंद्रांमध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास २ लाख मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप केले. दुसºया टप्प्यात २८ आॅगस्ट रोजी उर्वरीत ९२ हजार मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.