शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

लोकवर्गणीतून साकारली अभ्यासिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 3:26 PM

मार्च २०१७ पासून सुरू असलेल्या या अभ्यासीका खोलीला वसंत कलाम असे नाव देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा, यासाठी मानोरा येथे नगर पंचायतच्या इमारतीमध्ये काही होतकरू युवकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून अभ्यासीका सुरू केली. त्याठिकाणी दैनंदिन अभ्यास करायला येऊन ग्रामीण भागातील युवकांकडून आयएस, आयपीएस होण्याची धडपड केली जात असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.नगर पंचायत कार्यालयाच्या बाजूलाच दोन खोल्यांची एक इमारत अडगळीत पडून होती. या खोलीचे दरवाजे, खिडक्याही तुटल्या होत्या. अशा बिकट अवस्थेतील खोलीला एका चांगल्या कामासाठी उपयोगात आणण्याची संकल्पना तत्कालीन मुख्याधिकारी अमोल माळकर यांना सूचली. ती त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणत नगर परिषद उपाध्यक्ष अमोल राऊत यांच्या मदतीने इमारतीची स्वच्छता करून घेतली. सोबतच लोकवर्गणीतून पैसे जमवून खोलीची दुरूस्ती करण्यासह नवीन दरवाजे, खिडक्या बसविल्या. खुर्ची आणि टेबल आणून या खोलीत अभ्यासीका सुरू केली. होतकरू विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन काही वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके, उपलब्ध करून दिली. मार्च २०१७ पासून सुरू असलेल्या या अभ्यासीका खोलीला वसंत कलाम असे नाव देण्यात आले आहे. ३५ विद्यार्थी करतात दैनंदिन स्पर्धा परीक्षेचा सरावरणजीत जाधव, अमोल राऊ त, अमोल माळकर, शिवरतन पांडिया आदिंनी अभ्यासिका सुरू होण्यासाठी अर्थसहाय्य दिले आहे. येथे दररोज ३० ते ३५ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा सराव करतात. ज्यांना अभ्यास करायला जागा नाही, पुरेशा सुविधा नाहीत, अशी मुले येथे दररोज सकाळी ९ ते रात्री ८ वाजतापर्यंत पुस्तकात डोके घालून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. येथे अभ्यास करणारे तीन युवक स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन विविध पदावर कार्यरत आहेत. प्रज्वल पदमगीरवार नामक युवक येथे ‘केअर टेकर’ म्हणून काम करतो.

 

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी