लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले . ते स्थानिक श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय राज्यशास्त्र व संशोधन विभागाच्यावतीने आयोजित संशोधन पद्धतीवर एकदिवसीय कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये संशोधन प्रवृत्ती वाढीस लागावी व शास्त्रशुद्ध संशोधन प्रणालीच्या आधारावर संशोधन करण्याची सवय संशोधक, प्राध्यपकांना लागावी यासाठी राज्यशास्त्र तसेच संशोधन विभागाच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी आपल्या पुढील मार्गदर्शनात संशोधन पद्धतीवर मार्गदर्शन करतांना, संशोधन पद्धतीनुसार शोधप्रबंध तसेच शोध निबंधाला शास्त्रीय मान्यता मिळविण्यासाठी त्याचे लिखाण कसे असले पाहिजे, संशोधन विषयाचे शिर्षक पॉइंटेड असावा तसेच तो विषय सुक्ष्मपातळीवर असला पाहिजे, विषय निवडीनंतर त्याचा उद्देश व्याप्ती निश्चित असली पाहिजे, कोण, कसा, कुठे काय, केव्हा या पाच क च्या आधारावर आपले संशोधन आधारित असले पाहिजे, संशोधनासाठी किमान पाच गृहितके तयार करणे आवश्यक आहे कारण गृहितके हा संशोधनाचा कणा आहे. तीन गृहितके सकारात्मक आणि दोन गृहिते नकारात्मक असणे आवश्यक आहे. तसेच संदर्भ देण्याच्या पद्धतीबाबतील बारकावे काय आहेत या मुद्यावर पॉवर पॉंइन्ट प्रेझेन्टेशनद्वारे विस्तृत विवेचन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक, संचालन व आभार डॉ. अशोक जाधव यांनी मानले.सदर कार्यशाळेस महाविद्यालयातील शिक्षक डॉ.संतोष खंडारे डॉ. अशोक जाधव, उमेश कुºहाडे, डॉ. योगेश पोहोकार, प्रा. पराग गावंडे, प्रा.संजय कापशीकर, प्रा. नितेश थोरात, प्रा.दिलीप वानखेडे, डॉ. अर्चना गुल्हाणे,प्रा.शुभांगी जयस्वाल उपस्थित होते.
संशोधनाचे विषय हे समाज उपयुक्त असावे - प्राचार्य डॉ. सुभाष गवई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 3:40 PM