वाशिम, दि. ४- सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाला ३ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, या दरम्यान अभिनंदन पत्र व मिठाई देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे.पूर्वीच्या तुलनेत आता महिला बर्यापैकी यशाची शिखरे गाठत आहेत. मात्र, पुरुषांच्या तुलनेत स्त्री जन्मदराचे प्रमाण कमी असल्याने पुरुष-स्त्री लिंगगुणोत्तरात तफावत निर्माण होत आहे. तफावतीची ही दरी कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्ण अभियान सुरू केले असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. पुरुष-स्त्री लिंगगुणोत्तराचे प्रमाण वाढविणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाने स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बालिका दिनाचे औचित्य तसेच सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवानिमित्त आरोग्य केंद्रात जाऊन स्त्री जन्माचे स्वागत, मातांचे अभिनंदन केले जात आहे. ३ व ४ जानेवारीला जिल्हा रुग्णालयात मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, सीईओ गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला.
स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा प्रशासनाचा असाही उपक्रम!
By admin | Published: January 05, 2017 2:13 AM