ठळक मुद्देतालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील घटना सततची नापिकी व कर्जबाजारीपणा कंटाळून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम): तालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील ५० वर्षीय शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ३ डिसेंबर रोजी दुपारी घडली. दिपक लालू राठोड यांनी तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, प्रल्हाद भगवान राठोड यांनी सततची नापीकी व कर्जबाजारीपणला कंटाळून घराशेजारील गोठयात गळफास घेवून ३ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतक शेतकर्याकडे चार एक शेती असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्याची माहिती आहे.