लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील सोमेश्वर नगर माहेर असलेल्या विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ जून रोजी उघडकीस आली.सोमेश्वर नगर येथील आरती महेश चव्हाण (२२) हिचा विवाह खवरदरी (ता.पूर्णा, जि.परभणी) येथे झाला होता. ती काही दिवसांकरिता माहेरी सोमेश्वरनगर येथे आली होती. अशात १७ जून रोजी रात्री जेवण करून मुला-बाळांसह झोपले असता सकाळी उठल्यावर आरती आढळून आली नाही. शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. सुखदेव आडे यांच्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी र्मग दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास पीएसआय राहुल काटकाडे करीत आहेत.
विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या
By admin | Published: June 19, 2017 4:18 AM