वाशिम : आयुक्त व क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी वाशिम कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत गिष्मकालीन क्रिडा प्रशिक्षण शिबीराचा समारोप स्थानिक जिल्हा क्रिडा संकुलावर झाला. सदर शिबीराच्या समारोपासमयी बादशाह धामणे, मानप सभापती डॉ.भागवत महाले, प्राचार्य बाळासाहेब गोटे, प्राचार्य संतोष राठोड, हरिभाउ दिवटीया, दिलीप पवार, अशोक राउत, सतिष ईखार, बावणे, उंडाळ, प्रा.चतरकर, संतोष मलीक, प्रा.तनय गोडे, प्रा.संजय शिंदे व इतर उपस्थित होते.सदर समारोप वेळी फुटबॉल व कबड्डीचे प्रदर्शनीय सामने घेण्यात आले या प्रसंगी प्राचार्य बाळासाहेब गोटे, यांनी आपल्या मनोगतातून खेळाडंूनी अतिशय मनमुराद आनंद घेतला व त्यातून आपले बरेच कौशल्य विकसीत केलेले दिसून येत आहहे तसेच डॉ. भागवत महाले यांनी प्रशिक्षण शिबीराच्या खेळाडूंना अतिशय योग्य प्रकारे उपयोग घेवून प्रत्यक्षात या कौशल्याचा प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये उपयोग आणावा असे आवाहन केले सदर शिबीराचेप्रथम वाशिम जिल्हयामध्ये कबड्डीचे क्रिडा प्रशिक्षण शिबीर व प्रदर्शनी सामने घेण्यात आले सदर शिबीरामध्ये राष्ट्रीय पदक विजेता व सहभागी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलदिप बदर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रल्हाद आळणे यांनी केले सदर शिबीरातील सामन्यामध्ये पंच म्हणून किसन सोनटक्के,हितवा बेनीवाले, विकास नवघरे, सतिष पट्टेबहादूर, संजय पट्टेबहादूर,यांनी काम पाहीले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शेखर पाटील जिल्हा क्रिडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली किशोर बोंडे, राज्य क्रिडा मार्गदर्शक रफिक मामू, सुनिल देशमुख, विनायक जवळकर गफुर पप्पुवाले, चेतन शेंडे, सचिन आळणे, संदेश पवार, राजदीप मनवर, अमोल गोटे, राहूल धामणे, उमेश धामणे, कलीम बेग मिर्झा , भारत वैद्य, संतोष कनकावर, देविदास धामनकर, सागर आळणे, सुरेश उगले, तसेच नॅशनल युथ क्लबचे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले
ग्रिष्मकालीन क्रिडा शिबीराचा समारोप
By admin | Published: May 20, 2017 1:35 PM