शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लावलेली अटीडीएम मशीन शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे यात फेरफार जुने फेरफार कोतवाल बुक नक्कल हक्क नोंदणी पेरेपत्रक जात पडताळणीकरिता लागणारी कागदपत्रे, जुने सातबारा गाव, नमुना आठ अ, ही कागदपत्रे एका क्लीकवर मिळत आहेत. यासाठी अर्ज करणे, कर्मचाऱ्यांना शोधणे, चकरा मारणे आदी अडचणी दूर झाल्या असून, ही मशीन फायदेशीर ठरते आहे. मालेगाव शहरात एकूण दोन मशीन होत्या त्यापैकी तहसील कार्यलयमधील मशीन बंद असून, केवळ बाजार समितीमधील मशीन सुरू आहे. त्यामूळे तालुक्यातील अनेक गावचे लोक येथे कागदपत्रे काढण्यासाठी येत आहेत. काही दिवसांपूर्वी तर इतर तालुक्यातील मशीन बंद असल्यामुळे त्या तालुक्यातील लोकही कागदपत्रे काढण्यासाठी येथे येत होते. आतापर्यंत १४ हजार ३०० लोकांनी याचा लाभ घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत लावलेल्या एटीडीएम मशीनचा अनेक शेतकरी, विद्यार्थी फायदा घेत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि परिश्रम दोन्हीची बचत होते याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती किसनराव घुगे यांनी केले आहे.
बाजार समितीमधील एटीडीएम मशीनमुळे शेतकऱ्यांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:33 AM