शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

आधार नोंदणीचे काम दोन महिन्यांपासून बंद

By admin | Published: July 04, 2017 2:20 AM

जिल्ह्यातील वास्तव: जिल्ह्यातील सर्व अधिकृत केंद्रांकडील आधार किट परत करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात आधार नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेली ५३ केंद्र महिनाभरापासून बंद आहेत. सदर पोर्टल बंद करण्यात आल्याने हजारो नागरिकांची आधार नोंदणी रखडली आहे. परिणामी, शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाने प्रत्येक नागरिकांची एक ओळख असावी, या उद्देशाने आधार नोंदणी बंधनकारक केली. यासाठी केंद्र शासनाने सीएमएस कॉम्प्युटर लिमिटेड मुंबई या कंपनीला आधार नोंदणीचे काम दिले होते. यासाठी जिल्ह्यातील ५३ अधिकृत महा ईसेवा केंद्रांना आधार किट देण्यात आल्या होत्या. दरम्यान, शासनाने दोन महिन्यांपूर्वी सीएमएस कंपनीचा सदर करार रद्द केला. या कंपनीबाबतच्या काही अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला. यामुळे पॅन नंबरला लिंक करण्यासाठी आधार कार्ड दुरुस्ती करणे, नवी नोंदणी करणे, ही कामे थांबली. त्याशिवाय निराधारांना बायोमेट्रिक पद्धतीने अनुदान वितरित करण्यासाठी त्यांच्या बोटांचे ठसे अपडेट करणेही आवश्यक असून, हे कामही थांबले आहे. शासकीय योजना, शाळा प्रवेश असो वा इतर कोणत्याही शासकीय योजनेसाठी आधारकार्डची मागणी केल्या जाते. ज्या नागरिकांकडे आधारकार्ड नसेल त्याला शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते, यासाठीच जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ५३ आधार केंद्र सुरू करण्यात आली होती. या केंद्राच्या माध्यमातून २०११ च्या जनगणनेनुसार आधार नोंदणीचे उद्दिष्ट १०० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे; परंतु २०११ नंतरच्या लोकसंख्येचा विचार करता हजारो नागरिक आधार नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. शासनाच्या आवाहनानंतर अनेकांनी लहान बाळांचीदेखील आधार नोंदणी केली; परंतु माहितीचा अभाव व वेळोवेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना नोंदणी करता आली नाही. त्यातच जिल्ह्यातील आधार किटधारकांचे मानधन व अनामत रक्कम खोळंबली असून, शासनाने सीएमएस कंपनीचा करार रद्द केल्यानंतर सदर पोर्टल बंद असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची रखडलेली आधार नोंदणी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केल्या जात आहे. याची दखल घेण्याची मागणी आधारकार्डपासून वंचित असलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने सीएमएस कंपनीकडून आधार नोंदणीचे काम काढून घेतले असून, हे काम महाआॅनलाइनमार्फत करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी सीएमएसचे काम बंद केले आहे. आता जिल्ह्यात आधारअभावी निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी ईआयटीबाबत बोलणे केले असून, येत्या आठवडाभरात ही समस्या निकाली लागणार आहे. -शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी वाशिम