शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोमात असलेल्या मुलाच्या देहदानाचा निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 8:26 PM

मालेगाव (वाशिम) : अगदीच हसतखेळत आयुष्यातील एकेक दिवस उलटत असताना १७ जून २०११ रोजी झालेल्या अपघातात त्याच्या मेंदूला मार लागला. तेव्हापासून आजतागायत तो कोमात आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी मुलाच्या उपचारात कसर न ठेवता जवळ असलेली शेती विकून, बँकेसह नातेवाईकांकडून कर्ज घेवून तब्बल ४० लाख रुपये खर्चत त्याच्यावर उपचार केला; परंतू त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर नियतीपुढे हात टेकलेल्या अभाग्या आई-वडिलांनी जड अंत:करणाने आपल्या मुलाच्या देहदानाचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्दे दोन महिन्यांपूर्वी झाला होता अपघातअपघातात त्याच्या मेंदूला मार लागला  आर्थिक परिस्थिती बेताची 

अरविंद गाभणे लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : अगदीच हसतखेळत आयुष्यातील एकेक दिवस उलटत असताना १७ जून २०११ रोजी झालेल्या अपघातात त्याच्या मेंदूला मार लागला. तेव्हापासून आजतागायत तो कोमात आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी मुलाच्या उपचारात कसर न ठेवता जवळ असलेली शेती विकून, बँकेसह नातेवाईकांकडून कर्ज घेवून तब्बल ४० लाख रुपये खर्चत त्याच्यावर उपचार केला; परंतू त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर नियतीपुढे हात टेकलेल्या अभाग्या आई-वडिलांनी जड अंत:करणाने आपल्या मुलाच्या देहदानाचा निर्णय घेतला आहे. मालेगावमध्ये वास्तव्यास असलेल्या लव्हाळे कुटूंबियासोबत नियतीने खेळलेला खेळ ह्रदय पिळवटून टाकणारा ठरावा असाच आहे. वसंतराव आणि वनिता या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या दोन मुलांमध्ये मोठा मुलगा असलेला सुरज हा घरात लाडका होता. धष्टपूष्ट शरीरयष्टीच्या सुरजने १२ वी पर्यंतच्या शिक्षणानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून पदविका प्राप्त केली. २०११ मध्ये त्याची तांत्रिक अ‍ॅप्रेंटिसशिप सुरू होती. मात्र, सर्व काही सुरळित सुरू असताना नियतीची त्याच्यावर वक्रदृष्टी फिरली आणि होत्याचे नव्हते झाले. १७ जून २०११ रोजी मालेगाव-अकोला राज्य महामार्गावरील रिधोरा फाट्यानजिक मोटारसायकलने प्रवास करित असताना सुरजचा अपघात झाला. या घटनेत त्याच्या मेंदुला जबर मार लागला. दरम्यान, अकोला येथील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली; परंतू मार अधिक असल्याने शस्त्रक्रियेला प्रतिसाद मिळण्याऐवजी तो कोमात गेला. त्यानंतर आई-वडिलांनी सुरजला नागपूरच्या मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी तब्बल एक महिना त्याच्यावर उपचार चालले. मात्र, त्याचाही विशेष उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजास्तव सुरजला घरी आणण्यात आले. तेव्हापासून आजतागायत तो घरातील अंथरूणावर खिळून आहे. मागील पाच वर्षांत त्याची सुश्रृषा करण्यात, त्याच्या औषधोपचारावर खर्च करण्यात आई-वडिलांनी कुठलीच कसर ठेवली नाही. मात्र, शेती विकून झाली, कर्जाचा मोठा डोंगर ‘आ’ वासून पुढे उभा झाल्याने यापुढील उपचारासाठी आई-वडिलांकडे पैसे शिल्लक राहिले नसल्याने त्यांनी आता सुरजच्या देहदानाचा निर्णय घेतला असून त्यादिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.