लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : अनेक वर्षाच्या मागणीनंतर मंजुर झालेल्या उड्डाण पुलाच्या कामात गैरप्रकार होत असून नियमानुसार काम होत नसल्याची तक्रार पंचायत समितीच्या उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कामाची पाहणी केली असता अनेक बाबी निदर्शनास आल्यात. नियमानुसार काम करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना दिलेत.वाशिम - पुसद रस्त्यावर असलेल्या उडाणपुलाअभावी वाहनधारकांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता. जिल्हयातील लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने या कामाला मंजुरात मिळून प्रत्यक्षात गत एक महिन्यापूर्वीपासून कामासही सुरुवात करण्यात आली. काम सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतिने उडाणपुलाव्यतिरिक्त जागेवर अतिक्रमण झाल्याची बाब मधुबाला चौधरी यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी सदरची तक्रार पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे सुध्दा दिली. निवेदनात म्हटले की, उड्डाण पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असुन दोन्ही साईडचे सेंटर पासुन अंतर जर जोडले तर फार तफावत दिसुन येते व तसेच आय.यु.डी.पी.मधील एका मोटारसायकल शो रुमसमोरील समांतर १२ मिटर अस्त्विात असलेल्या रस्त्यावर ३ मिटरचे अतिक्रमण सा.बां.विभागाने केल्याचे नमूद केले आहे. संबंधीत रस्त्याची खाजगी मोजणी केली असता शांती निकेतन विद्यालय संबंधीत रस्त्याची मोजणी केली असता शांतीनिकेतन शाळेकडे समांतर रस्ता आज रोजी सा.बां.विभागाने अतिक्रमण केल्यामुळे भविष्यात रहदारीस अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता निवेदनातून वर्तविण्यात आली आहे. बायबल नॅझरीन स्कुलच्या हद्दीपर्यत रोडचे सेंटर १०.६० मिटर आहे व तसेच शोरुमपर्यंतचे अंतर १६.०० मिटर असे एकुण ६ मिटरचे उड्डाण पुलाचे बांधकाम करणाºया सा.बां.विभागाने लक्ष न दिल्यामुळे सदर काम कंत्राटदार स्वत:चे मनाप्रमाणे करतांना दिसून येत आहे. या कामाची आपल्या स्तरावरुन चौकशी करुन पुर्वीचा अस्तित्वात असलेला समारंतर रस्ता हा ४० फुटचा असावा अशी मागणी चौधरी यांनी केली होती. या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाडेकर यांनी केली असून काम नियमानुसार करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, सुभाषराव चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
उड्डाण पुलाच्या कामाची बांधकाम विभागाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 7:36 PM
अनेक वर्षाच्या मागणीनंतर मंजुर झालेल्या उड्डाण पुलाच्या कामात गैरप्रकार होत असून नियमानुसार काम होत नसल्याची तक्रार पंचायत समितीच्या उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कामाची पाहणी केली असता अनेक बाबी निदर्शनास आल्यात. नियमानुसार काम करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना दिलेत.
ठळक मुद्देउड्डाण पुलाच्या कामात गैरप्रकारपंचायत समिती उपसभापती मधुबाला चौधरी यांनी केली होती तक्रार