शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

जिल्ह्यात आढळला झिका व्हायरसचा संशयित रुग्ण!

By सुनील काकडे | Published: July 13, 2024 5:23 PM

आरोग्य विभाग ‘अलर्ट’ : विशेष पथक गावात डेरेदाखल

सुनील काकडे, वाशिम : तालुक्यातील देपूळ येथे झिका व्हायरसचा एक संशयित रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. यामुळे आरोग्य विभाग ‘अलर्ट मोड’वर असून २५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक गावात डेरेदाखल झाले आहे. या पथकाने बारकाईने सर्वेक्षण करून नागरिकांना सुरक्षेसबंधी मार्गदर्शन केले.

प्राप्त माहितीनुसार, देपुळ येथे वास्तव्यास असलेल्या एका महिलेस काही दिवसांपूर्वी ताप आला. सांधे देखील दुखायला लागले. त्यामुळे ती उपचारासाठी वाशिम येथील खासगी डाॅक्टर अतुल काळुशे यांच्याकडे गेली. काही ठराविक तपासण्या केल्या असता तिच्यात विशिष्ट लक्षणे आढळून आली. ती ‘झिका व्हायरस’ची असू शकतात, असे डाॅ. काळूशे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी त्याची गंभीर दखल घेत देपूळातील संबंधित महिला रुग्णाची भेट घेतली. तसेच रक्ताचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेकडे पाठविले. पथकामध्ये पार्डी टकमोर आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कालवे, विस्तार अधिकारी (आरोग्य) विठ्ठल ठाकरे, संजय गंगावणे, पाणी पुरवठा कर्मचारी रामेश्वर गंगावणे, सुनिता अंभोरे. डी.एम. गंगावणे, राजू वाघ, डी.जी. ताजणे, सुनिल सरकटे, पुंडलिक देवळे, पांडुरंग नप्ते आदिंचा समावेश होता.काय आहे झिका व्हायरस?

झिका विषाणू रोग किंवा झिका ताप हा मुख्यतः संक्रमित एडीस प्रजातीच्या डासांच्या चावण्याने होतो. एखाद्या गर्भवती महिलेस संक्रमित डासाने चावा घेतल्यास झिका विषाणू प्लेसेंटामध्ये प्रवेश करू शकतो आणि गर्भावर देखील परिणाम करू शकतो. ‘झिका’चा संसर्ग कुणालाही होऊ शकतो, परंतु गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका आहे. या आजारावर लस किंवा औषध उपलब्ध नाही.झिका व्हायरसची लक्षणे

खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणेताप, सर्दी, घाम येणेस्नायू वेदना आणि डोकेदुखीथकवा जाणवणे, भूक मंदावणेदेपूळ येथे जाऊन संबंधित रूग्णाची भेट घेतली. त्या रूग्णात आढळलेली लक्षणे ‘झिका व्हायरस’सारखी वाटत आहेत. त्यामुळे रक्ताचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या आजाराबाबत भिती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, खबरदारी घेणे गरजेचे आहे. - डाॅ. संगिता देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :Zika Virusझिका वायरस