वाशिम, दि. ४- कारंजा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मनभा येथील जिल्हा परिषद ऊदरु प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षकाने चौथ्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला होती. आरोपी शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर, ४ मार्च रोजी सदर शिक्षकाना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिले. अब्दुल मतीन अब्दुल वहाब असे निलंबित शिक्षकाचे नाव आहे.मनभा येथील जिल्हा परिषद ऊदरु प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक म्हणून अब्दुल मतीन अब्दुल वहाब हा कार्यरत आहेत. हा शिक्षक त्याच शाळेत इयत्त चौथीत शिकणार्या नऊ वर्षीय विद्यार्थीनीसोबत गत काही दिवसांपासून अश्लिल चाळे करीत होता. आरोपी शिक्षकाचा त्रास अनावर झाल्याने पीडित विद्यार्थिनीने ही बाब तिच्या आई-वडिलांना सांगितली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाल्याने २८ फेब्रुवारी रोजी आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३७६, २ ब , फ, आय, व बाललैंगिक अत्याचार अधिनियम ३,४,५,६ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. विद्यमाने न्यायालयाने सदर आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी अब्दुल मतीन अब्दुल वहाब याला निलंबित केले.
अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार करणारा शिक्षक निलंबित
By admin | Published: March 05, 2017 2:11 AM