वाशिम, दि. २२-: शेतकरी कर्जमाफीसाठी विधिमंडळात गदारोळ घातल्यामुळे रिसोड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांना निलंबित करण्यात आले. या प्रकाराबाबत जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांंंमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, २३ मार्च रोजी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, पीककर्जमाफी आणि शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळात गदारोळ घातल्यामुळे ३१ डिसेंबरपयर्ंत निलंबन करण्यात यावं, असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला होता. तो प्रस्ताव मान्य करण्यात आल्याने, आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये अमित झनक यांचाही समावेश आहे. या प्रकाराबाबत जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात विधिमंडळात आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार्या आमदारांवर निलंबनाची कारवाई होणे ही बाब लोकशाहीला धरून नाही. या घटनेचा निषेध नोंदवून जिल्हय़ात आंदोलनाचा इशारा सभापती सुधीर पाटील गोळे, यमुना जाधव, डॉ. संतोष बाजड, बबनराव पाटील, प्रकाश वायभासे, सोनूबाबा सरनाईक, पंजाबराव अवचार, बाबूराव शिंदे, सतीश गाडे, प्रशांत हाडे, जुल्फिकार, राजू राऊत, गोपाल सरनाईक, गोपाल मोरे, राहुल भुतेकर, चेतन हाडे, रवी बोडखे, सतीश वानखेडे विष्णू मोरे, गणेश बोडखे, विनोद बोरकर यांच्यासह पदाधिकार्यांनी दिला.
झनकांच्या निलंबनावर जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया
By admin | Published: March 23, 2017 2:13 AM