लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चुकीच्या प्रकारे निविदा सूचना प्रक्रिया राबवून रस्त्यांच्या कामांचे कंत्राट देण्यात आल्याची याचिका येथील कंत्राटदार विरेंद्र देशमुख यांनी उच्च न्यायालय सादर केली होती. त्यावर २९ जुलै रोजी निर्णय देताना न्यायालयाने कार्यारंभ आदेशांना स्थगिती दिली. त्यामुळे सुमारे ४० कोटी रुपये किमतीची पाच कामे काही काळासाठी थांबणार असल्याचे सूत्रांनी मंगळवारी सांगितले.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, वाशिम येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाने चुकीच्या पद्धतीने निविदा सूचना प्रक्रिया राबवून क्षमता नसणाºया कंत्राटदाराची निविदा मंजूर केली; तर ज्यांची क्षमता आहे, अशा कंत्राटदारांच्या निविदा नामंजूर करण्यात आल्या. यामुळे काही कंत्राटदारांनी उच्च न्यायालय याप्रकरणी याचिका दाखल करून सदर निविदा प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यावर २९ जुलै रोजी न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेशांना स्थगिती दिल्याची माहिती याचिकाकर्ते विरेंद्र देशमुख यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते कामांच्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 5:59 PM
वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चुकीच्या प्रकारे निविदा सूचना प्रक्रिया राबवून रस्त्यांच्या कामांचे कंत्राट देण्यात आल्याची याचिका येथील कंत्राटदार विरेंद्र देशमुख यांनी उच्च न्यायालयात सादर केली होती.
ठळक मुद्दे २९ जुलै रोजी निर्णय देताना न्यायालयाने कार्यारंभ आदेशांना स्थगिती दिली. सुमारे ४० कोटी रुपये किमतीची पाच कामे काही काळासाठी थांबणार असल्याचे सूत्रांनी मंगळवारी सांगितले.