शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

निवडणुकीत स्वबळाचा नारा

By admin | Published: December 07, 2015 2:28 AM

मालेगाव व मानोरा नगर पंचायत; बंडखोरी रोखण्याचे आव्हान

मालेगाव/मानोरा (जि. वाशिम): नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा देत मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मालेगाव व मानोरा नगरपंचायत निवडणुकीत १0 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार असून, १0 जानेवारीला मतदान होणार आहे. सत्तास्थापनेचा पहिला मान मिळविण्यासाठी प्रमुख पक्ष व आघाड्यांनी कंबर कसली. मालेगावात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षांसह बबन चोपडे व चंदू जाधव हे सारेच कामाला लागले. नगराध्यक्ष बनण्याकरिता आरक्षित असलेल्या २, ८ व १३ क्रमांकाच्या वॉर्डांंंंवर सर्वांंंचेच लक्ष आहे. सध्या तरी कुणाची युती झाली नसल्याने प्रमुख पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीने मैदानात उतरले आहेत. काही स्थानिक नेत्यांनी आघाडीची हाक दिली. उमेदवारही या ना त्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षातर्फे अद्याप कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत. आमदार अमित झनक व गोपाल मानधने हे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची नेतेमंडळी अमित झनक यांच्यासोबत फिरल्याचे सर्वश्रुत आहे. यावेळी ते एकमेकांच्या विरोधात उतरल्याने अस्पष्टता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे बाबाराव खडसे व उल्हासराव घुगे यांनी ताब्यात घेऊन १७ जागा लढवण्याचे जाहीर केले. भाजपसुद्धा स्वबळावर १७ जागा लढणार, हे जाहीर असले तरी अद्याप कुणाच्या नेतृत्वात, हे स्पष्ट नाही. संतोष जोशी यांच्या नेतृत्वात शिवसेना सर्व जागा लढणार आहे. जिल्हा परिषद सदस्य चंदू जाधव आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बबनराव चोपडे हे स्वतंत्रपणे १७ जागा लढविणार आहेत. रिपाइं (आठवले गट) ने व भारिप-बमसंनेही निवडणुकीची हाक दिल्याने राजकारण तापले आहे. सारेच स्वबळावर लढण्याची भाषा करीत असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. चंदू जाधव यांना सोबत घेऊन परंपरागत मैत्री असणारे भाजपा-सेना एकत्र लढतील, असा सर्वांंंंचा अंदाज होता; मात्र त्यांच्यामध्ये सध्या तरी एकमत झाल्याचे दिसत नाही.