लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : सोयजन येथील आत्महत्याग्रस्त सचिन मनोहर राठोड यांच्या कुटूंबाला शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणुन शासनाची विविध आर्थिक मदत द्या आणि मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा यासह विविध मागण्यासाठी १४ नोव्हेबर रोजी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसील कचेरीवर धडकला.यावेळी संघटनेच्यावतीने शासनाचा निषेध करुन मागण्यांचे निवेदन परिक्षावेधीन तहसीलदार निळे यांना देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मानोरा तालुक्यात आठ महिन्यात कर्र्जबाजारी पणाला कंटाळुन दोन शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली.नुकतेच सोयजना येथे एका युवा अविवहित शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली, परंतु अद्यापही आत्महत्याग्रस्त कुटूंबाला शासनाने कोणतीच आर्थिक मदत केलेली नाही तसेच मदतीचा प्रस्ताव सुध्दा प्रशासनाने केले नसल्याचे समजते. मध्यंतरी पावसाने ५० दिवसाच्या खंड दिला, त्यामुळे खरीपाच्या उत्पादनात कमालीची घट आली. त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असुन दुष्काळ सदृश्य स्थितीत आतापासुनच पाणी व जनावराना चारा टंचाई उदभवत आहे. या सर्वत्र बाबीचा विचार करुन तात्काळ आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला आर्थिक मदत व मानोरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर करावा असे दिलेल्या निवेदनात शेतकरी स्वाभीमानी संघटनेच्यावतीने नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी दामुअण्णा यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 5:44 PM