००००००००००००००००
शिक्षकांना मिळेना जीपीएफच्या पावत्या!
वाशिम : जिल्ह्यात जि. प. प्राथमिक शाळांत ३ हजारांवर शिक्षक कार्यरत असून, त्यांना जीपीएफच्या पावत्या दोन दोन वर्षे मिळत नाहीत. त्यामुळे शिक्षकांना जीपीएफचा हिशेबही कळणे कठीण आहे. शिवाय इतरही समस्या आहेत. त्यामुळे जि. प. प्राथमिक शिक्षक यांचा ७ व्या वेतन आयोगाचा २ रा हप्ता जीपीएफमध्ये जमा करावा, मार्च २०२० पासून जीपीएफ हप्ता जमाचे विवरण पावत्या देण्यात याव्या, अशी मागणी सतीश सांगळे यांनी १३ सप्टेंबर रोजी केली.
---------------
अंगणवाडीत महिलांना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन
वाशिम : महिला आणि बालविकास विभागाच्यावतीने तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रात मंगळवारी महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. या कार्यक्रमात मातांना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यायची, कोणता आहार घ्यायचा, याबाबत विस्तृत मार्गदर्शन अंगणवाडी सेविकांनी केले.
------------
पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान
वाशिम : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांसह पालक, कोथिंबीर, टोमॅटो, कोबी आदी भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय सततच्या पावसामुळे या पिकांवर किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे. यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
^^^^^^^^^^
माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित
वाशिम: अनुदान, जुनी पेन्शन योजना यांसह शिक्षण संस्था आणि माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सदर मागण्या निकाली काढण्याची मागणी जुनी पेन्शन योजनेपासून वंचित शिक्षकांनी १३ सप्टेंबर रोजी केली.
------------
^^^^^^^^^