लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : परिसरातील गावांत खरीपाची पेरणी ९० टक्के उरकली असून, आता बहतर असलेल्या पिकांत तणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकºयांनी डवरणीसह फवारणीच्या कामाला वेग दिला आहे. त्यात पावसामुळे सर्वत्र हिरवळ निर्माण झाली असून, गुरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. मंगरुळपीर तालुक्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने खरीपांच्या पेरणीला वेग आलेला आहे. आसेगाव परिसरात २३ जुनपासून पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आला. सद्यस्थितीत परिसरातील ९० टक्के पेरणी उरकली आहे. त्यात सोयाबीनचे प्रमाण ७५ टक्के, तर मुग, उडिद आणि तुरीसह कपाशीच्या पिकाचे प्रमाण २५ टक्के आहे. आता खरीपाची बहुतांश पिके वितभर वाढल्यानंतर पिकांत तण वाढू नये म्हणून शेतकºयांनी डवरणीसह फवारणीच्या कामांना वेग दिल्याचे चित्र दिसत आहे. त्यात दमदार पावसामुळे हिरवा चारा उगवला असून, सर्वत्र हिरवळ पसरल्याने गुरांच्या चाºयाचा प्रश्न मिटला आहे. त्यात शिवारातील लहानसहान खड्ड्यांसह छोट्या तलावात जलसंचय झाल्याने गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही मिटली आहे. शिवारात गुराखी निवांत गुरे चारत असतानाचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. सायकल डवऱ्याचा वापर अधिकआसेगाव परिसरात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून, डवरणीसाठी बैल वा मजूर लावण्याची त्यांची क्षमता नाही. अशात सायकल डवरा अर्थात एका माणसाला सहज चालविता येईल, अशा हात डवºयाचा वापर अल्पभूधारक शेतकरी करताना दिसत आहेत. अल्प किमतीत मिळणारे आणि सहज हाताळता येणारे हे सायकल डवरणी यंत्र अल्पभूधारक शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.
आसेगाव परिसरात डवरणीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 4:55 PM