..................
का वाढले भाव...
गेल्या काही दिवसात डिझेलच्या प्रतिलिटर दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याचा थेट परिणाम होऊन वाहतूकदारांनी मालवाहतुकीच्या दरातही वाढ केली आहे. यामुळे सर्वच किराणा साहित्याचे दर वाढले असून साखरेचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी वधारले आहेत.
- महेंद्र दागडिया
..................
श्रावण महिन्यात साखरेला तुलनेने मागणी अधिक प्रमाणात असते. याशिवाय येणाऱ्या महिन्यांमध्ये महत्त्वाचे सण येत असून गोडधोड पदार्थ बनविण्याची रेलचेल असते. त्यासाठी लागणाऱ्या साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दर वाढलेले आहेत.
- मनीष बत्तुलवार
.....................
महिन्याचे बजेट वाढले
कोरोना काळापासून सर्वच प्रकारच्या किराणा साहित्याचे दर वाढलेले आहेत. विशेषत: आधी तेल आणि आता साखरेच्या दरात वाढ केल्याने महिन्याचे घरखर्चाचे बजेट वाढले आहे. वाढलेले दर कमी व्हायला हवेत.
- राधा शिंदे
.................
खाद्यतेलाचे दर गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे काटकसर करावी लागत आहे. अशातच आता साखरेच्या दरातही वाढ झाल्याने अडचणीत अधिकच भर पडली आहे.
- मीनाक्षी देशमुख
................................
जिल्ह्याला दररोज लागते साखर - ३००००
श्रावण महिन्यात मागणी वाढली - ३५०००
..............
साखरेचे दर (रुपये प्रति किलो)
जानेवारी - २८
फेब्रुवारी - २८
मार्च - २९
एप्रिल - २९
मे - २९.५०
जून - ३०
जुलै - ३०
ऑगस्ट - ३१