लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कौशल्य विकास विभाग व शासकीय तंत्रनिकेतन वाशिम यांच्यावतीने रिठद येथे आयोजित मोफत शिलाई मशिन प्रशिक्षणाचा समारोप शनिवारी करण्यात आला.महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पंचायत समिती सदस्य शारदा नारायणराव आरू यांच्या पुढाकारातून सदर मोफत शिलाई मशिन प्रशिक्षणाचे आयोजन रिठद येथे करण्यात आले होते. जुलै ते सप्टेंबर असे तीन महिने महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. जवळपास ६० महिलांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, आता त्या स्वयंरोजगारासाठी सक्षम झाल्याचा दावा आयोजकांनी केला. समारोपीय कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य शारदा नारायणराव आरू, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते नारायणराव आरू, हनुमान बोरकर, ,गंगाधर आरू, गजानन बोरकर, ज्ञानेश्वर खानझोडे, कौशल विकास विभागाचे लोणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शारदा आरू म्हणाल्या की, महिलांना या प्रशिक्षणाचा लाभ होणार असून, त्यांचा स्वत:चा रोजगार सुरू व्हावा यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले.
रिठद येथे शिलाई मशिन प्रशिक्षणाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 7:37 PM
वाशिम : कौशल्य विकास विभाग व शासकीय तंत्रनिकेतन वाशिम यांच्यावतीने रिठद येथे आयोजित मोफत शिलाई मशिन प्रशिक्षणाचा समारोप शनिवारी करण्यात आला.
ठळक मुद्देशासकीय तंत्रनिकेतनतर्फे आयोजन तीन महिने मिळाले प्रशिक्षण